मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबईतील सत्र न्यायालयात (एनडीपीएस कोर्ट) आज सुनावणी झाली. सुमारे ५ तासांपेक्षा जास्त काळ ही सुनावणी सुरु होती. एनसीबीकडून आर्यन खानच्या जामीनाला जोरदार विरोध करण्यात आला. अमित देसाई यांनी आर्यनची बाजू मांडली. यात सुनावणी बरीच लांबली. त्यामुळे आर्यन खानच्या जामिनावर आता उद्या (गुरुवार) दुपारी १२ वाजता सुनावणी होणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयाचा कामकाजाचा वेळ संपल्यामुळे आर्यन खान, मुमून धामेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या ह्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे. उद्या परत एनडीपीएस कोर्टात परत 12 वाजता सुनावणी होणार आहे. आज 5 तासाहून अधिक काळ सुनावणी नंतर मुंबईत एनडीपीएस कोर्टाने सुनावणी उद्यावर ढकलली आहे.
सुनावणीतील ठळक मुद्दे
- अमित देसाईंचा युक्तिवाद संपला
- क्रुझ पार्टीवर सापडलेल्या अमली पदार्थांचं प्रमाण हे बऱ्याच देशांत कायदेशीर आहे
- "अटक केलेली मुलं तरूण आहेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांनी या काळात फार भोगलंय, त्यांना योग्य तो धडा मिळालाय. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करावा"
- अमित देसाईंचा युक्तिवाद संपला
- आर्यन खानकडून रोख रक्कमही हस्तगत झालेली नाही
- त्यामुळे क्रुझवर इतरांकडे सापडलेले हे अमली पदार्थ विकत घेण्याचा, सेवन करण्याचा किंवा ते इतरांना विकण्याचा त्याचा बेत होता या गोष्टीही सिद्ध होत नाही
- तसेच आर्यनविरोधात एनसीबीनं लावलेल्या कलमांखाली त्याला जास्तीत जास्त एका वर्षाची शिक्षा होऊ शकते
- त्या आधारावर कायद्यानं त्याला जामीन मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे
- अमित देसाईंचा आर्यनसाठी युक्तिवाद
- नंतर अटक केलेल्या काही आरोपींसोबतही आर्यनची चौकशी करायची असा एनसीबीचा दावा होता
- मुळात आर्यनचा याप्रकरणात अटक केलेल्या प्रत्येक आरोपीशी संबंध जोडण्याचा एनसीबीचा प्रयत्न होता
- त्यांचा हाच प्रयत्न खोडून काढत मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं तिसऱ्यांदा आर्यनची पोलीस कोठडी नाकारत त्याला न्यायालयीन कोठडी दिली - देसाई
- कोर्टाकडून यापुढे आर्यनच्या कोठडीतील चौकशीची गजर नसून त्याला जामीनास पात्र ठरवण्यात आलं होत - देसाई
- 'आर्यनची समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो' - एनसीबी
- पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो - एनसीबी
- एनसीबीनं केवळ आर्यन, अरबाझ आणि मुनमुनच्या अर्जावर उत्तर सादर केले.
- इतर पाच आरोपींच्या जामीनावर अद्याप उत्तर का नाही? वकिलांचा आक्षेप
- ज्या तीन जणांच्या जामीनावर उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश होते, ते आम्ही दिले - एनसीबी
- आमच्यावर कुणीही पक्षपातीपणाचा आरोप करू नये- एनसीबी
- इतरांच्या जामीनावर 22 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करू - एनसीबी
- मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज केवळ आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्याच जामीन अर्जावर सुनावणी
- आर्यन खानच्या वतीनं जेष्ठ कायदेतज्ञ अमित देसाईंचा युक्तिवाद
- रिकव्हरी केलेले ड्रग्स आर्यनकडून नाही तर चोकर, इस्मित आणि अरबाज यांच्याकडून रिकव्हर केले आहे - देसाई
- ड्रग्सचा वापर, विक्री आणि व्यापाराची माहिती तेव्हा आर्यन खानला नव्हती - देसाई
- तिन्ही आरोपींच्या जामीनावर युक्तिवाद संपल्यावर आम्ही युक्तिवाद करू - एएसजी अनिल सिंह
- एनसीबीनं काय केस बनवली, यापेक्षा सध्या आर्यन खानला जामीन मिळवून देणं आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा - देसाई
- 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खान एका निमंत्रणावरून त्या क्रुझवर गेला.
- आतमध्ये प्रवेश करत असतानाच अचानकपणे NCB नं तिथं धाड टाकली
- त्यानंतर त्यांना शोध असलेल्या काही व्यक्तींचीच झाडाझडती सुरू केली
- त्यानंतर एकापाठोपाठ एक अमली पदार्थ सापडत गेले
- एनसीबीनं खूप चांगलं काम केलंय असं दाखवलं गेलं, मात्र त्यांची माहिती चुकीची होती.
- तपासात काही जणांकडे अमली पदार्थ सापडले, मात्र ते फारच कमी प्रमाणात होते.
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यन खानकडे कोणताही अमली पदार्थ सापडलेला नाही.
- आर्यन अमली पदार्थ इतरांमार्फत घेत होता, असा जर त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे.
- हे आरोप सिद्ध करण्यासाठी मुळात आरोपींकडून अमली पदार्थ हस्तगत होणं गरजेचं असतं, जे इथं झालेलंच नाही - देसाई
- अरबाज मर्चंटबरोबर आर्यन खान ड्रग्स पार्टीला पोहचल्याचे शाहरुख खानच्या ड्रायव्हरने सांगितले.
- अरबाज मर्चंट यांच्याकडे ड्रग्स सापडले आहे. यामुळे आर्यन खानही या प्रकरणात सहभागी असल्याचा खुलासा एनसीबीच्या वकिलांनी आपल्या उत्तरात केला आहे.
- यांच्या चौकशीतून अनेकांना अटक केली आहे. यामुळे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय ड्रग्स पेलडरपर्यंत पोहचत आहे.
- एनसीबीचे वकील अद्वैत सेठना यांनी आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध केला.
- आर्यन खानला जामीन मिळाल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते किंवा पुरावे मिटविण्याची शक्यता आहे - सेठना
- आर्यन खानचे वकील अमित देसाईंनी एनसीबीच्या वकिलांच्या उत्तराला विरोध केला.
हेही वाचा -सुनावणीला काही तास शिल्लक असताना शाहरुख खानने आर्यनचा वकील बदलला