मुंबई -ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार (Hearing of Rituja Latkes petition) आहे. ऋतुजा लटके शिवसेना ठाकरे गटाच्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार निश्चित झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने अद्यापही राजीनामामंजूर न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकी करिता उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटचा दिवस आहे. ऋतुजा लटकेसुद्धा सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित (Rituja Latkes petition in Bombay High Court) आहेत. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेणार की नाही, दुपारी अडीचपर्यंत सांगण्याचे महापालिकेला खंडपीठाचे निर्देश दिले आहेत.
Bombay High Court : ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाचा निलासा; राजीनामा मंजूर करण्याचा BMC ला सूचना
ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात थोड्याचवेळात सुनावणी सुरू होणार (Rituja Latkes petition in Bombay High Court) आहे. ऋतुजा लटके शिवसेना ठाकरे गटाच्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार निश्चित झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने अद्यापही राजीनामा मंजूर न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली (Hearing of Rituja Latkes) petitionआहे.
राजीनामा अद्यापही मंजूर नाही - मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित BMC ला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऋतुजा लटके यांची बाजू वकील विश्वजित सावंत यांनी मांडली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी याकरिता खंडपीठासमोर मेंशनिंग दरम्यान मागणी केली होती 14 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने यावर उद्याच तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली (Hearing oF Rituja Latke) आहे.
उच्च न्यायालयात धाव -ऋतुजा लटके यांनी त्यांच्या याचिकेत असे म्हटले आहे की, तीन तारखेला राजीनामा देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. नोटीस स्प्रेडच्या तीस दिवस पूर्ण होत नसल्याचे कारण दिले असल्याने नियमाप्रमाणे एका महिन्याचा पगार देखील जमा करण्यात आला आहे. तसेच राजीनामा देता वेळी देण्यात आलेल्या कारणांमध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यात येणार आहे या संदर्भात मी कुठलाही उल्लेख केलेला नाही. मात्र मला अंधेरी पोट निवडणूक लढवण्याचे इच्छा असल्याने राजीनामा मंजूर करण्यात यावा असे राजीनामा म्हटले आहे. मात्र तरीदेखील अद्यापही राजीनामा मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेण्यात आली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.