महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fadnavis Vs Sattar : नया है वह! देवेंद्र फडणवीस यांचा अब्दुल सत्तार यांना टोला

शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Minister of State Abdul Sattar) यांनी काल दिल्लीमध्ये भाजप -शिवसेनाला एकत्र आणण्यासाठी भाजप व शिवसेना यांच्यातील पूल गडकरी बांधून शकतात (Gadkari can build bridges between Shiv Sena) असं वक्तव्य करून मोठा गौप्यस्फोट केला. याबाबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार यांना, "नया है वह!" असे म्हटले आहे.

Fadnavis on Sattar
सत्तारांवर बोलले फडणवीस

By

Published : Jan 5, 2022, 5:28 PM IST

मुंबई:शिवसेनेचे नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल दिल्लीमध्ये बोलताना राज्यात कोणतही परिवर्तन घडवायचा असेल त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहेत. भाजपा युतीचा पूल बांधायचा असेल तर ते फक्त गडकरी करू शकतात. असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी समाचार घेत अब्दुल सत्तार यांना, "नया है वह!" असा उपरोधक टोला लगावला आहे.

सत्तारांवर बोलले फडणवीस

सत्तार ६ महिन्यात मुख्यमंत्र्यांना भेटले असतील का

त्याचबरोबर नितिन गडकरी मोठे नेते आहेत याचा मला आनंद आहे. व यात कुठलाही वाद नाही. परंतु अब्दुल सत्तार स्वतः गेल्या ६ महिन्यापासून मुख्यमंत्र्यांना भेटले असतील का? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. जर ही गोष्ट करायची असेल तर यासाठी एक जबाबदार माणूस हवा असे सांगून त्यांनी अब्दुल सत्तार यांची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल दिल्लीत बोलताना असे म्हटले की,राज्यात कोणतंही परिवर्तन घडवायचं असेल त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरी यांच्यासोबत आमचे जुने संबंध आहेत. त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. मग ते विरोधक का असेनात. गडकरी हे राजकारणातील विद्यापीठ आहेत. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचेही जुने संबंध आहेत.
मात्र राज्यातील भाजप नेत्यांच्या राजकारणामुळे गडकरी राजकारणात लक्ष देत नाहीत. भाजप आणि युतीचा पूल बांधायचा असेल तर ते फक्त गडकरीच करू शकतात. परंतु युतीचा निर्णय शेवटी उद्धव ठाकरेच घेतील, असे वक्तव्यही अब्दुल सत्तार यांनी केले होत.

हेही वाचा : भाजप मोर्चांला घाबरत नाही, पण मोर्चा आला तर ते मला मारतील - जितेंद्र आव्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details