मुंबई -राज्य सरकार विरोधात बोलणाऱ्या लोकांना विरोधात सूडबुद्धीतून कारवाई करण्यात येत आहे. राज्यात अनेक प्रश्न असताना देखील राज्य सरकार त्या प्रश्नाकडे लक्ष न देता राज्य सरकारवर बोलणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करण्यात व्यस्त आहे. सत्र न्यायालयाने आम्हाला जामीन दिल्यानंतर पुन्हा आमची जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासंदर्भात आज आम्ही सत्र न्यायालयात हजर झालो होतो. पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार आहे. त्यावेळी देखील आम्ही न्यायालयात हजर राहणार असे खासदार नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
पुढील सुनावणी 27 जून रोजी - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन रद्द करण्यात यावा याकरिता राज्य सरकारकडून सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. राणा दाम्पत्यांना देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुंबई पोलिसांकडून केली होती. त्यावेळी सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. राणा दाम्पत्यांनी यावर उत्तर सादर करताना म्हटले होते की, कुठल्याही प्रकारचा नियमाचे उल्लंघन करण्यात आले नाही आहे. त्यानंतर आज राणा दाम्पत्य न्यायालयात स्वतः हजर झाले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार आहे. त्यावेळी देखील राहणार दाम्पत्य प्रत्यक्षात हजर राहणार आहेत.
भाजपाचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार जिंकेन - राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजप विरोधात कोणीही उमेदवार उभा राहिल्यास त्यांचा पराभव होणे निश्चित आहे. कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी आवश्यक बहुमत असणे आवश्यक असते. सध्या भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक बहुमत असल्याने राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.