मुंबई- विक्रोळीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. शेखर जाधव असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असल्याचे माहिती मिळाली आहे.
विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार - शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार
विक्रोळीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. शेखर जाधव असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार
विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोर नगरमधील साई मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तीकडून सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेखर जाधव यांना धमक्या येत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही.
Last Updated : Dec 19, 2019, 12:26 PM IST