महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Milind Narvekar: उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या तयारीत..? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

Milind Narvekar Will Join Shinde Group: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर Shiv Sena Secretary Milind Narvekar हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील Minister Gulabrao Patilयांनी केला मात्र या डाव्याबाबत काहीही न बोलता मुख्यमंत्र्यांनी मी काही लपवून ठेवत नाही असे सांगत सावध भूमिका घेतली आहे.

Milind Narvekar Will Join Shinde Group
Milind Narvekar Will Join Shinde Group

By

Published : Oct 1, 2022, 7:53 PM IST

मुंबई:शिवसेनेचा दसरा मेळाव्याची Shiv Sena Dussehra gathering जय्यत तयारी सुरू असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर Shiv Sena Secretary Milind Narvekar हे शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील Minister Gulabrao Patil यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर हे लवकरच शिल्लक सेनेतून शिवसेनेच्या शिंदे सोबत येतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पक्षात कोण येणार कोण नाही, याबाबत मी कधीही काहीही लपवून ठेवत नाही. मिलिंद नार्वेकर येणार असतील तर मी नक्की सांगेन, असे सांगत अत्यंत सावध भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर ?मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत. शिवसेनेच्या कार्यकारिणीतील महत्त्वाचे सदस्य आहेत. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडताना शिंदे गटाशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने हेच मध्यस्थी करताना दिसत होते. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रीचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच गणेशोत्सवा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या गणेशाचे दर्शनही घेतले होते.

मिलिंद नार्वेकर ठाकरेंची सावली ?मिलिंद नार्वेकर हे गेल्या अनेक वर्ष ठाकरे घराण्याशी संबंधित आहेत. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून ते वावरत होते. मातोश्रीमध्ये थेट प्रवेश आणि वावर असलेले ते ठाकरे घराण्याशी एकमेव संबंधित होते. मिलिंद नार्वेकर आणि रश्मी ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदारी असल्याबाबतही अनेक चर्चा यापूर्वी झाल्या आहेत. शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या अनेक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर यापूर्वी खापर फोडले आहे. नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्याने मिलिंद नार्वेकर यांनी कान भरल्यामुळे आपल्यावर अन्याय झाला, असा आरोप करत शिवसेना सोडली होती.

रवी म्हात्रे यांची पुन्हा इंट्रीदरम्यान शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाला मिलिंद नार्वेकर यांची आतून फूस असल्याची कुजबूज मोठ्या प्रमाणात सुरू झाली. या चर्चेनंतर हळूहळू मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रीतल्या वावरावर निर्बंध येऊ लागले. पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहाय्यक रवी म्हात्रे यांना पसंती देण्यात आली असून मिलिंद नार्वेकरांची जागा आता उद्धव ठाकरेंसोबत रवी म्हात्रे यांनी घेतल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

नार्वेकर पक्ष सोडणार नाहीत पेडणेकरदरम्यान या संदर्भात शिवसेनेच्या प्रवक्ता आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असता मिलिंद नार्वेकर असे काही करणार नाहीत. त्यांची पक्षावर आणि उद्धव ठाकरेंवर निष्ठा आहे. ते पक्ष सोबतच राहतील, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details