महाराष्ट्र

maharashtra

2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी; मुंबई मेट्रोचा मार्ग मोकळा

By

Published : Aug 29, 2019, 3:01 PM IST

Updated : Aug 29, 2019, 5:20 PM IST

मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी मिळाली आहे. झाडे तोडण्याच्या विषयावर नेमलेल्या समितीने 8 विरुद्ध 6 मतांनी प्रस्ताव मंजूर करून मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे.

तोडण्यात आलेले झाड

मुंबई - मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी मिळाली आहे. झाडे तोडण्याच्या विषयावर नेमलेल्या समितीने 8 विरुद्ध 6 मतांनी प्रस्ताव मंजूर करून मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे.

शिवसेनेकडून या निर्णयाला विरोध कायम असून, समितीमधील शिवसेनेच्या ६ सदस्यांनी झाडे न तोडण्याच्या बाजूने मतदान केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे ५ आणि इतर ३ सदस्यांनी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Last Updated : Aug 29, 2019, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details