मुंबई -रेल्वे रूळ ओलांडताना अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने एक नवीन प्रयोग केला आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे दादर स्थानकात गेल्या 5 महिन्यात शून्य अपघात झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना यश, 'ग्रीस'चा प्रयोग ठरला यशस्वी; गेल्या 5 महिन्यात शून्य अपघात - भायखळा
सध्या लोक नेहमी आपल्या जीवापेक्षा कपड्याला जपतात, हीच बाब मध्य रेल्वेने हेरली.आणि ज्या खांब्याला पकडून लोक रेल्वे रूळ ओलांडतात त्याच खांब्याला मध्य रेल्वेने ग्रीस लावले. खांबांना ग्रीस लावल्यामुळे 16 फेब्रुवारी पासून आजपर्यंत मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात रूळ ओलांडून एकही अपघात झालेला नाही.
सध्या लोक आपल्या कपड्यांना खूप जपतात, हीच बाब मध्य रेल्वेने हेरली आणि ज्या खांबाला पकडून लोक रूळ ओलांडतात त्याच खांबाला मध्य रेल्वेने ग्रीस लावले. प्रवासी खांबाला पकडताच त्यांचे कपडे खराब होतात आणि ते रूळ न ओलांडताच परत फिरतात. हा प्रयोग मध्य रेल्वेने दादर स्थानकात राबविला. खांबांना ग्रीस लावल्यामुळे 16 फेब्रुवारीपासून आजपर्यंत मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात रूळ ओलांडून एकही अपघात झाला नसल्याचे मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
'ईटीव्ही'शी खास बातचीत करताना उदासी यांनी सांगितले की, आमचा उद्देश लोकांचे कपडे खराब करणे नसून जीव वाचवणे आहे. लोक काही सेकंद वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात, यामुळे आम्ही हा प्रयोग राबविला आणि तो यशस्वी झाला आहे. म्हणून आम्ही ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ठिकाणी हा प्रयोग राबविणार आहोत. दादरनंतर भायखळा स्थानकातही खांबांना ग्रीस लावण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.