महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात १०० युनिटपर्यंत मोफत वीजेचा निर्णय लवकरच; मुंबईकरांनाही दिवाळीसाठी खुशखबर - वाढीव वीज बिल होणार माफ

मुंबईकरांना राज्यसरकारकडून दिवाळीची खुशखबर मिळणार आहे. लॉकडाऊन काळात आलेली वाढीव वीजबिलात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच येत्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचाही निर्णय विचाराधीन असल्याचेही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

good news before Diwali
मुंबईकरांनाही दिवाळीसाठी खुशखबर

By

Published : Nov 2, 2020, 5:29 PM IST

Updated : Nov 2, 2020, 5:45 PM IST


मुंबई- मागील अनेक महिन्यांपासून वाढीव वीज बिलाने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिवाळीत खूशखबर दिली जाणार आहे. वाढीव वीज बिले माफ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयाद्वारे राज्य सरकारकडून मुंबईकरांना ही दिवाळीची भेट दिली जाणार आहे. तसेच हिल्या १०० युनिट पर्यंत वीजबील माफ करण्याचा निर्णय मोफत देण्याचा शब्द दिला आहे. तो पूर्ण करणार असल्याचे सूचक वक्तव्यही राऊत यांनी यावेळी केले आहे.

मुंबईत 12 ऑक्‍टोबरला अचानक वीज गायब झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री मुंबईतील विविध ऊर्जा उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या प्लांटला भेट देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी ट्रॉम्बे येथे असलेल्या टाटा पॉवरच्या प्लांटला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वाढीव बील माफी संदर्भातील ही माहिती दिली. तसेच नुकतेच मी कळवा येथे भेट दिली आहे. त्यानंतर आज टाटा पॉवर झाले आता उद्या अदानी पॉवरला भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मी मुंबईत वीज गायब झाल्याने शंका व्यक्त केली होती, त्यावर तांत्रिक समिती अहवाल रविवारी आला आहे. तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल, तसेच मी जी तांत्रिक समिती नेमली होती. त्याचा अहवाल येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईकरांनाही दिवाळीसाठी खुशखबर

मुंबईतील वाढीव वीज बिल कमी करण्यावर बोलताना राऊत म्हणाले, वाढीव वीजबील माफ करण्यासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबईतील नागरिकांना त्याची गोड बातमी मिळेल. नुकतेच राज ठाकरे यांनी वीज बिलाच्या मुद्यावरून राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांशीही संवाद साधला होता.त्यावर राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला गेल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या शंभर युनिट पर्यंत वीज माफी लवकरच-

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतचे वीज बील माफ करण्याचा निश्चय केला होता. पहिल्या १०० युनिट पर्यंत वीजबील माफ करण्याचा निर्णय मोफत देण्याचा शब्द दिला आहे. तो पूर्ण करणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले आहे.

दहा वर्षात मुंबईकरांना पाच हजार मेगावॉट वीज-

मुंबईत १० हजार मेगावटची ट्रान्समिशन ची व्यवस्था आहे. मात्र पुढील दहा वर्षात म्हणजेच २०३० पर्यंत मुंबईला पाच हजार मेगावॉट वीज लागेल, त्यामुळे त्यात वाढ होण्यासाठी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईत वीज उत्पादन वाढविण्यासाठी अनेक यंत्रणा या अजून आणि त्याचे आधुनिकीकरण केले जाणार असून त्यासाठी चा कार्यक्रम वर्षभरात पूर्ण केला जाणार आहे यामुळे आता असलेल्या वीज उत्पादन आणि त्यातील कमतरता याचा विषय सुद्धा त्यातून मार्गी लागणार आहे. २३०० मेगावॉट पर्यंत विजेचे उत्पादन वाढवले पाहिजे. चांगल्या दर्जाची वीज आम्ही मुंबईकरांना देणार आहोत.

'कृषी उर्जा' नवं धोरण आणणार-

राज्यातील शेतीला ४ तास शेतीला सलग वीजपुरवठा दिला जाणार आहे आणि त्यासाठीच सरकारकडून लवकरच कृषी उर्जा नवं धोरण आणले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच येत्या काळामध्ये सौर उर्जेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Nov 2, 2020, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details