महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CORONA VIRUS : पोलिसांकडून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' तपासणी बंद, महासंचालकांचे आदेश - ट्राफिक पोलीस

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रिथ एनलायजर ही मशीन संबंधीत व्यक्तीच्या तोंडाजवळ नेऊन त्याची तपासणी केली जाते. त्यामुळे अशा चाचणीच्या माध्यमातून देखील कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता आहे

Drunk and drive corona
ड्रंक अँड ड्राईव्ह

By

Published : Mar 17, 2020, 2:06 PM IST

Updated : Mar 17, 2020, 3:06 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा विळखा पसरत चालल्याचे लक्षात आल्यानंतर याबद्दल प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातल्या वेगवेगळ्या परिसरात वाहतूक पोलीस विभागाकडून 'ड्रंक अँड ड्राईव्ह'सारखी तपासणी करताना वापरण्यात येणाऱ्या यंत्राचा वापर काही काळासाठी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या सूचना देण्यात आल्या आहेत.

CORONA VIRUS : पोलिसांकडून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' तपासणी बंद, महासंचालकांचे आदेश

हेही वाचा...कोरोना इफेक्ट : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चालणार फक्त 2 तास

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रिथ एनलायजर ही मशीन संबंधित व्यक्तीच्या तोंडाजवळ नेऊन त्याची तपासणी केली जाते. त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण अशा प्रकारे होण्याची शक्यता आहे. तसेच तपासणी करणाऱ्या पोलिसांना देखील अशा माध्यमातुन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील वेगवेगळ्या वाहतुक पोलीस विभागात या मशीनचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Last Updated : Mar 17, 2020, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details