मुंबई - कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेने देशभरातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या आहेत. तथापी, दूध, भाजीपाला, अन्नधान्य इत्यादी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालवाहतूक गाड्या ( Goods train) चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेला सर्वसाधारणपणे देशातील आणि विशेषतः मुंबईच्या गरजा भागवण्यासाठी २४/७ काम करावे लागत आहे.
'दूध, भाजीपाला, अन्नधान्य इत्यादी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आपल्याला देशाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने २४/७ काम करावे लागेल. या कठीण काळात आम्हाला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल आणि फ्रेट गाड्यांची वेगवान वाहतूक सुनिश्चित करण्यात मदत करावी लागेल', असे आवाहन मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना केले आहे.
नियंत्रण कक्ष आणि स्टेशनवरील इतर फ्रंटलाईन कर्मचार्यांना चोवीस तास काम करण्यासाठी नेमण्यात आले आहे. महत्त्वाच्या वस्तूंचे लोडिंग व अनलोडींग करण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. व्यापा-यांच्या सोयीसाठी, निशुल्क वेळेत तसेच डॅमरेज आणि व्हारफेजची रिलॅक्सेशन केली गेली आहे.
गेल्या ३ दिवसात देशभरात कोळशाचे 74 रॅक, 45 रॅक कंटेनर, 6 रॅक खते, 15 रेक पेट्रोल, तेल आणि वंगण, एक रॅक कांदा विविध ठिकाणी भरण्यात आला आहे.