मुंबई -मुंबईत अडीच वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा ( Ganeshotsav is celebrated with pomp ) करण्यात आला. मुंबईमधील प्रसिद्ध अशा गणपती मंडळांना नागरिक, पर्यटकांना भेटी देता याव्यात यासाठी बेस्टने गणेश दर्शन रात्र बस सेवा ( BEST Ganesh Darshan Night Bus Service ) सुरू केली होती. या बसला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला ( Good response to BEST Ganesh Darshan night bus service ) आहे. १० दिवसांत २५ हजार ७१२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून बेस्टला ४ लाख ५३ हजार २६९ रुपये महसूल मिळाल्याचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे ( Public Relations Officer Manoj Varade ) यांनी सांगितले.
२५ हजार प्रवाशांचा प्रवास -मुंबईत गणेशोत्सवाचा ( Ganeshotsav in Mumbai ) आनंद वेगळाच असून गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंतामणी असे प्रसिद्ध गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील भक्त गणेशोत्सव मुंबईत येतात. गणेश भक्तांसाठी बेस्ट उपक्रमाने गणेश दर्शन रात्र बस सेवा ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुरु केली होती. गणेश दर्शन रात्र बस सेवेला गणेश भक्तांचा भरपूर प्रतिसाद मिळाला असून १० दिवसांत २५ हजार ७१२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून बेस्टला ४ लाख ५३ हजार २६९ रुपये महसूल मिळाल्याचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितले.