महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Boot Polish : मुंबईतील चाकरमान्यांसाठी खुशखबर.. ऐतिहासिक CSMT स्थानकात पुन्हा घुमणार 'पॉलिश.. बूट पॉलिश..' आवाज! - Polish Boot Polish

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गेल्या काही दिवसांपासून बूट पाॅलिश कामगार (Boot polish workers in mumbai )गायब झाले आहेत. त्यामुळे सरकारी, खासगी अधिकारी, कर्मचारी, सर्व सामान्य प्रवाशांचे बूट पाॅलिशचे वांदे तर झाले. याबाबत सर्व प्रथम ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित केली होती. यानंतर रेल्वेने सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा बूट पॉलिशसाठी कंत्राट (Contract for shoe polish ) काढले जाणार आहे. त्यांची निविदा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने ईटीव्ही भारतला दिली आहे.

बूट पाॅलिश कामगार
बूट पाॅलिश कामगार

By

Published : Jan 24, 2022, 7:06 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गेल्या काही दिवसांपासून बूट पाॅलिश कामगार (Boot polish workers in mumbai )गायब झाले आहेत. त्यामुळे सरकारी, खासगी अधिकारी, कर्मचारी, सर्व सामान्य प्रवाशांचे बूट पाॅलिशचे वांदे तर झाले. याबाबत सर्व प्रथम ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित केली होती. यानंतर रेल्वेने सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा बूट पॉलिशसाठी कंत्राट (Contract for shoe polish) काढले जाणार आहे. त्यांची निविदा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने ईटीव्ही भारतला दिली आहे.

लवकरच निविदा मागविणार -
कोरोनानंतर रेल्वेवर अवलंबून असलेल्या रोजगाराची चाके देखील गतिमान होण्यास सुरुवात झाली आहे. प्रवाशांची वर्दळ पुन्हा मुंबईतील रेल्वे स्थानकात दिसू लागल्याने बूट पॉलिश कामगार, खाद्यपदार्थ स्टॉलधारक, फळविक्रेते अशा सर्वांना दिलासा मिळाला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बूट पॉलिश कामगारांना गेल्या काही दिवसापूर्वी मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या सोसायटीची नोंदणी नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांचा करार रद्द केला आहे. यामुळे सीएसएमटी स्थानकातून इतिहासात पहिल्यांदाच बूट पॉलिश कामगारांना हद्दपार झाला आहे. ईटीव्ही भारतने याबाबत सर्व प्रथम बातमी प्रकशित केली होती. याच बरोबर सीएसएमटी स्थानकातील बूट पॉलिश कामगारांची व्यस्था मांडली होती. यानंतर आता मध्य रेल्वेचे वाणिज्य विभागा कामाला लागले आहे. सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांचा सुविधेसाठी पुन्हा बूट पॉलिश कामगारांसाठी कंत्राट काढणार आहे. त्यांची निविदा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने ईटीव्ही भारतला दिली आहे.

हे ही वाचा -'पॉलिश.. बूट पॉलिश..' आवाज हरवला.. ऐतिहासिक CSMT मधील बूट पॉलिश कामगार गेले कुठे?

..या तक्रारीमुळे कंत्राट रद्द -
२०१६ रोजी सीएसएमटी स्थानकातील बूट पॉलिश कामगारांचा सोसायटी बरोबर (Boot Polishing Workers Society) करार केला होता. त्यानंतर कोरोना काळात बूट पाॅलिश कामगारानाचा करार संपुष्टात आलेला होता. यानंतर पुन्हा एकदा बूट पॉलिश कामगारांबरोबर करार करतेवेळी सोसायटीची फेर नोंदणी झाली नव्हती. याबाबत दुसऱ्या बूट पॉलिश कामगारांच्या सोसायटीने याची तक्रार रेल्वेकडे केली होती. त्यामुळे तत्काळ सीएसएमटी स्थानकातील बूट पॉलिश कामगारांच्या सोसायटीला (Boot Polishing Workers Society) फेर नोंदणीसाठी दोनदा स्मरणपत्र दिले होते. तरी सुद्धा त्यांनी नोंदणी केली नव्हती. अखेर आम्हाला बूट पॉलिश कामगारांना स्थानकावरून हटवावे लागले आहे. यामुळे प्रवाशांना पर्यायी बूट पाॅलिशवाल्याकडे जावे लागत आहे. त्यात प्रवाशांचा मोठा वेळ खर्च होत होता. मात्र, आता रेल्वे पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकात बूट पॉलिश कामगारांसाठी कंत्राट काढत आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा सीएसएमटी रेल्वे स्थानकात 'पॉलिश.. बूट पॉलिश..' आवाज ऐकू येणार आहे.

बूट पाॅलिश कामगार
रेल्वे बूट पॉलिश कामगारांची संख्या -
कोरोनापूर्वी मुंबई विभागातील मध्य आणि पश्चिम रेल्वे बूटपॉलिश करणाऱ्या कामगारांची संख्या सरासरी ६०० इतकी होती. मात्र, कोरोनामुळे लोकल सेवेवर निर्बंध आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या बूटपॉलिश कामगारांचा धंदा कमी झालेला होता. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा व्यवस्थित होत नव्हता. परिणामी अनेकांनी बूट पॉलिश करण्याचा व्यवसाय सोडून गाव गाठले होते. आज जवळ-जवळ ४५० मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बूटपॉलिश कामगार कार्यरत आहेत. आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जवळ जवळ २५ बूट पॉलिश कामगार कार्यरत होते. मात्र आता सीएसएमटी स्थानकातील या बूट पॉलिश कामगारांची अधिकृत नोंदणीच नसल्याने त्यांना स्थानकावरून हटविण्यात आले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकांवर बूट पॉलिश कामगार आण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details