महाराष्ट्र

maharashtra

कोरोना योद्धा : वर्दीतला देव माणूस! पन्नासहून अधिक मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

By

Published : Apr 27, 2021, 9:18 AM IST

ज्ञानदेव वारे हे सध्या खाकी वर्दीतला देव माणूस म्हणून ओळखले जात आहेत. २००१ पासून वारे यांनी तब्बल 50 हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मृतक कोणत्या धर्माचा आहे. त्या धर्मानुसार त्यांनी मृतकांवर धार्मिक विधी करत अंत्यसंस्कार केलेत. कोरोनाच्या भयावह काळात देखील त्यांनी काम सुरुच ठेवले आहे.

पोलीस दलातर्फे वारे यांचा सन्मान
पोलीस दलातर्फे वारे यांचा सन्मान

मुंबई- ज्ञानदेव वारे खाकी वर्दीतला देव माणूस. वारे पोलिस दलात नाईक पदावर कार्यरत आहेत. मात्र या माणसाने आत्तापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोना काळात मदतीला धावून येणाऱ्यांची संख्या कमी आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्याची सुद्धा सोय नाही. अशावेळेस जर एखादा रुग्ण दगावला तर त्याच्या मृतदेहाची परवड होते. अंत्यसंस्काराला देखील घरचे उपस्थित राहू शकत नाही. अशा कठीण प्रसंगी वारे यांनी तब्बल ५० पेक्षा जास्त कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर आत्तापर्यंत अंत्यसंस्कार केले आहेत. या योद्ध्याचे कार्य शब्दात मांडण्याच्या पलिकडे आहे.

वर्दीतला देव माणूस!

मृतकांवर धार्मिक विधी करत अंत्यसंस्कार
२००१ पासून वारे यांनी तब्बल 50 हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेे आहेत. मृतक कोणत्या धर्माचा आहे. त्या धर्मानुसार त्यांनी मृतकांवर धार्मिक विधी करत अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाच्या भयावह काळात देखील त्यांनी हे काम सुरुच ठेवले आहे. हे कार्य करताना वारे यांच्या अंगावर पीपीई कीटचा अभाव जाणवला.

पोलीस दलानेही केला सन्मान

वारे यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. वारे स्वतः घरी गेल्यानंतर दिवसभरात केलेल्या कामामुळे अंगावरचे कपडे गरम पाण्यात टाकतात. स्वतः चे निर्जंतुकीकरण करुन घेतात आणि मगच घरात प्रवेश करतात. वारे यांचे कार्य पाहून पोलीस दलानेही वारे यांचा सन्मान केला आहे . विश्वास नागरे-पाटील सहआयुक्त कायदा सुव्यवस्था यांनी पोलीस दलातर्फे वारेनां ५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. ज्ञानदेव वारे यांनी सर्व नागरिकांना काळजी घेणे आणि घरात राहुण पोलिसांना सहकार्य करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा -ऑक्सिजनचा काळा बाजार; वाशिममध्ये 64 सिलिंडर जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details