मुंबई - केसर बाई इमारत दुर्घटनेत तुर्तास इमारतीचा जो मलबा पडलेला आहे, तो हटवणे हेच आमच्या पुढील सर्वात महत्वाचे काम आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
केसर बाई इमारत दुर्घटनेनंतर सरकारच्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून येथे वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जात आहे. मी एक मंत्री म्हणून जवळच असलेल्या जेजे रुग्णालयात आम्ही दुर्घटनेतील पीडितांसाठी स्वतंत्र वार्ड तयार केला आहे. या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर तातडीने इलाज आणि उपचार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.