महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'राम कदम विकासावर नाही तर, दोन्ही वेळेस लाटेवर निवडून आलेत'

घाटकोपर पश्चिम भाजपचे विद्यमान आमदार राम कदम हे एकवेळस राज ठाकरे यांच्या लाटेवर मनसेच्या तिकीटावर निवडून आले. तर, 2014 च्या निवडणुकीत ऐन वेळी पक्ष बदलत भाजपमध्ये प्रवेश करत नरेंद मोदीच्या लाटेत ते निवडून असल्याचे गणेश चुककल यांनी सांगितले.

By

Published : Oct 3, 2019, 9:16 PM IST

गणेश चुककल

मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काही तास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत. यातच घाटकोपर पश्चिमचे विद्यमान आमदारांनी 10 वर्षात विभागाचा विकास न करता जाहिरातबाजी आणि बेताल वक्तव्येच केली, असा आरोप घाटकोपर पश्चिम मनसेचे उमेदवार गणेश चुककल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केला

गणेश चुककल, मनसे उमेदवार, घाटकोपर पश्चिम

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

घाटकोपर पश्चिम भाजपचे विद्यमान आमदार राम कदम हे एकवेळस राज ठाकरे यांच्या लाटेवर मनसेच्या तिकीटावर निवडून आले. तर, 2014 च्या निवडणुकीत ऐन वेळी पक्ष बदलत भाजपमध्ये प्रवेश करत नरेंद मोदीच्या लाटेत ते निवडून आले आहेत. त्यांनी मतदारसंघात कोणतेही विकासाचे काम केले नसून केवळ विकास केला अशी बॅनरबाजी केली आहे. मतदारसंघात डोंगर उतारावरील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, इमारतीचे रखडलेल्या काम ठप्प आहे. एलबीएस रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी कमी करू, असे आश्वासन दिले होते मात्र, तेही काम अर्धवट आहे. त्यामुळे मनसेने मला विभागाचा विकास करण्यासाठी उमेदवारी दिली आहे. त्याचे मी सार्थक करणार आहे, असे गणेश चुककल यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details