मुंबई -घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराग शहा यांनी मागील 20 वर्षापासून या मतदारसंघात विकासच झालेला नाही, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात प्रकाश मेहता हे 20 वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत असून ते भाजपचेच आमदार होते.
20 वर्षांत मतदारसंघात विकास रखडलाय, पराग शहा यांची प्रतिक्रीया हेही वाचा... सावरकरांना भारतरत्न देण्याच्याआधी त्यांच्या पुतळ्याजवळचा रस्ता नीट करा - कन्हैया कुमार
काय म्हणाले पराग शहा ?
प्रकाश मेहता यांनी त्यांच्या मतदारसंघात काम केले नाही, असा आरोप विरोधक नेहमीच करतात. मात्र मेहता यांना डावलून ज्या पराग शहा यांना येथे उमेदवारी देण्यात आली त्या पराग शहा यांनीच आपल्या वक्तव्यातून त्याला खतपाणी घातले आहे. या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रकाश मेहता यांचे वर्चस्व होते. यावेळी तेच आमदार होणार अशी चर्चा असताना त्यांचे तिकीट कापून नगरसेवक पराग शहा यांना तिकीट देण्यात आली. पराग शहा यांनी माध्यमांसोबत बोलताना या मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून विकास रखडल्याचे म्हटले आहेय यामुळे मतदारसंघात झालेल्या विकासकामाबद्दल शहा यांनी व्यक्त केलेले मत विरोधकाच्या पथ्यावर पडणार, असे दिसत आहे.
हेही वाचा... विकासासाठी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, खडसेंची खदखद