महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विविध मागण्यांसाठी आश्रमशाळांचा १६ ऑगस्टपासून घंटानाद आणि बेमुदत अन्नत्याग - आमदार

'समान काम -समान वेतन' या तत्वावर आश्रम शाळांमधील शिक्षकांना देखील इतर शिक्षकांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. तसेच अनेक शेतकऱ्यांची मुले मोठ्या संख्येत आश्रमशाळांमधे शिक्षण घेत असल्यामुळे आश्रमशाळा अध्यावत होणे गरजेचे आहे.या आणि अश्या अनेक मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात १६ ऑगस्टपासून घंटानाद आणि बेमुदत अन्नत्याग करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आश्रम शाळा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महेश डवरे

By

Published : Jul 25, 2019, 11:16 AM IST

मुंबई - विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा या मागणीसाठी, १६ ऑगस्टपासून घंटानाद आणि बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला असून प्रहार आश्रम शाळा संघटना या संपात सहभागी होईल, असे प्रहार प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महेश डवरे यांनी मंत्रालयात सांगितले.

आश्रम शाळा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महेश डवरे म्हणाले, शिक्षक हे देश घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. यामुळे 'समान काम -समान वेतन' या तत्वावर आश्रम शाळांमधील शिक्षकांना देखील इतर शिक्षकांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. तसेच अनेक शेतकऱ्यांची मुले मोठ्या संख्येत आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे आश्रमशाळा अध्यावत होणे गरजेचे आहे. शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आणि सातवा वेतन आयोगही त्यांचा अधिकार असून तो लवकरच लागू करण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले आहे. याची पूर्तता मात्र अद्याप झालेली नाही. ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आश्रम शाळा संघटनेच्या आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनाही त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्त आम्ही महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना सहकार्याचे आवाहन करीत आहोत. असे आश्रम शाळा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महेश डवरे म्हणाले.

प्रहार आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या मागण्या -

- सातवा वेतन आयोग लागू करा.

- विजाभज आश्रमशाळांना ८ ते १० वी सेमी इंग्लिश आणि नर्सरी सुरु करण्याची परवानगी द्या.

- उच्च माध्यमिक आश्रमशाळांना संगणक आणि फिशरी अभ्सासक्रम द्या.

- अनुसूचित जातीच्या निवासी शाळांच्या धर्तीवर आश्रमशाळांना निवासी सुविधा पुरवण्यात याव्या.

ABOUT THE AUTHOR

...view details