मुंबई -कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यातील निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंदी होती. अखेर दोन वर्षानंतर राज्य सरकारने सर्वांसाठी प्रवेशाचे दारे उघडली आहेत. येत्या १८ मे पासून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे. ईटीव्ही भारतने 'निर्बंधमुक्त राज्यात मंत्रालयाला वगळले' या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते.
Maharashtra Ministry : अखेर मंत्रालयाचे दार उघडणार, सर्वसामान्यांना मिळणार १८ मे पासून प्रवेश - Corona Latest News
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १६ मार्च २०२० ला आदेश काढून सरकारने सर्वसामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध आणले होते. केवळ अतिमहत्त्वाच्या आणि तातडीच्या बैठकीसाठी मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. मंत्रालयात सर्व सामान्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली. ईटीव्ही भारतने हा विषय लावून धरला होता.
कोरोनामुळे होती प्रवेशबंदी, ईटीव्ही भारतने केला होता पाठपुरावा -कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १६ मार्च २०२० ला आदेश काढून सरकारने सर्वसामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध आणले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नियमांच्या आधारे मंत्रालयासह शासकीय कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मर्यादित उपस्थितीत प्रवेश देण्यात येऊ लागला. मंत्रालयाबाहेरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही प्रवेशाला बंदी होती. केवळ अतिमहत्त्वाच्या आणि तातडीच्या बैठकीसाठी मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. मंत्रालयात सर्व सामान्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली. ईटीव्ही भारतने हा विषय लावून धरला होता. अखेर प्रशासनाने नमते घेत, सर्व सामान्यांना प्रवेशाचा मार्ग खुला केला आहे.
नागरिकांना मिळाला दिलासा -येत्या १८ मे पासून अभ्यंगताना प्रवेश दिला जाणार आहे. मंत्रालयात कोरोना निर्बंधापूर्वी अभ्यागतांना दुपारी दोन नंतर त्यांच्या ओळखपत्राच्या आधारावर प्रवेश देण्याची संगणकीकृत व्यवस्था होती. गार्डन गेटकडून त्यांना प्रवेश दिला जात होता. फोटो काढून पास देण्याची पद्धत होती. ती पुन्हा कार्यान्वित केली जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे.