महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पाच दिवसाच्या गणपतीच्या 16 हजार 492 मूर्तींचे विसर्जन - मुंबई गणपती

शुक्रवारी पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत सायंकाळी रात्री 9 वाजत पर्यंत 16 हजार 492 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

गणेश विसर्जन

By

Published : Sep 6, 2019, 7:51 PM IST

Updated : Sep 6, 2019, 10:16 PM IST

मुंबई- आपल्या लाडक्या बाप्पाची मुंबईकरांनी सोमवारी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. शुक्रवारी पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत 16 हजार 492 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी गौरी आणि गणपतींचे एकत्र विसर्जन केले जाणार असल्याने या आकड्यात वाढ होणार आहे.

मुंबईतील गणेश विसर्जन

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकरा दिवस मुंबईकर तल्लीन होऊन बाप्पाची सेवा करतात. गणेशोत्सवा दरम्यान दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबईत आज पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी पालिकेने चौपाटीवर योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत. विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलावही उपलब्ध करून दिले आहेत. ज्या गणेश भक्तांच्या घरी गौरींचे आगमन झाले आहे. त्यांच्याकडून शनिवारी गौरी आणि गणपतींचे एकत्र विसर्जन केले जाणार आहे. ज्यांच्या घरी गौरींचे आगमन झाले नाही अशा गणेश भक्तांच्या घरातील गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. हे विसर्जन रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत सुरु राहील असे पालिकेकडून कळविण्यात आले आहे.

16 हजार 492 गणेश मूर्तींचे विसर्जन -
पाच दिवसांच्या गणेश मुर्त्यांचे आज विसर्जन करण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत पाच दिवसांच्या एकूण 16 हजार 492 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 161 तर घरगुती 16 हजार 331 मूर्तींचा समावेश आहे. कृत्रिम तलावांमध्ये 3 हजार 770 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 46 आणि घरगुती 3 हजार 724 गणेशमूर्तींचा समावेश आहे

Last Updated : Sep 6, 2019, 10:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details