मुंबई -कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे तसेच समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी न करण्याचे आवाहन अगोदरच करण्यात आले आहे. तसेच, आता गिरगांव परिसरातील 'डी' विभागाच्या हद्दीत विसर्जन करण्यासाठी भक्तांना स्थळ, दिनांक आणि वेळ ऑनलाईन बूक करावी लागणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने shreeganeshvisarjan.com ही वेब साईट सुरू केली आहे.
गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी.! बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आता ऑनलाईन बुक करावी लागणार - गणेश विसर्जन वेळ ऑनलाईन
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे तसेच समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी न करण्याचे आवाहन अगोदरच करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या हद्दीत 12 हजाराहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून 2 लाखाहून अधिक गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. विसर्जनावेळी समुद्र किनारी आणि कृत्रिम तलावाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर्षी मुंबईत कोरोनाचा प्रसार झाला असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वत्र 4 फुटातून छोट्या गणेशमूर्ती बसवण्यात येणार आहेत. या मूर्ती विसर्जन करण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागात वसाहतीजवळ कृत्रिम तलाव बांधण्याचे काम सुरू केले आहे. समुद्रातही गर्दी न करता विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत सर्वात मोठी गर्दी गिरगांव चौपाटीवर होते. तेथील गर्दी कमी करता यावी म्हणून पालिकेच्या डी विभाग कार्यालयाने वेबसाईट बनवली आहे. त्यावर गणेश विसर्जनाला जाण्यापूर्वी विसर्जन स्थळ, दिनांक आणि वेळ ऑनलाईन बूक करावी लागणार आहे. shreeganeshvisarjan.comअसे या वेब साईटचे नाव असून घरगुती आणि सार्वजनिक मंडळांना या वेबसाईटवर जाऊन डी विभागाच्या हद्दीत विसर्जन करण्यासाठी वेळ ऑनलाईन बूक करावी लागणार आहे.