मुंबई -पद्मभूषण पुरस्कार विजेते उद्योगपती राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन ( Rahul Bajaj Passes Away ) झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्या होणार अंत्यसंस्कार -
प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. आज त्यांचे दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ४.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
डॉ. ग्रॅंट म्हणाले यांनी सांगितले की,
यासंदर्भात माहिती देताना रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. ग्रॅंट म्हणाले, की गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावत होती. आज दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. आज दिवसभर त्यांचा मृतदेह रुबी हॉल क्लिनिकमध्ये ठेवले जाईल. उद्या सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेह दिला जाईल. त्यांचे निधन कार्डियाक आणि लंग्ज प्रॉब्लेममुळे झाले आहे. वय जास्त असल्याने त्यांना या समस्या भेडसावत होत्या.
बजाज उद्योगसमूहाला मोठे करण्यात महत्त्वाचे योगदान -