महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gas Agency : गॅसची एजन्सी देण्याच्या नावाखाली १५ लाखांची केली फसवणूक, आरोपीला घेतले ताब्यात

एलपीजी गॅसची एजन्सी ( LPG Gas Agency ) देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याला मुंबईत १५ लाखांचा गंडा घातला होता. बेपत्ता झालेल्या समता नगरच्या हद्दीत उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी औरंगाबादेतील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Bharat Gas Agency
गॅसची एजन्सी देण्याच्या नावाखाली १५ लाखांची केली फसवणूक

By

Published : May 10, 2022, 7:28 PM IST

मुंबई - एलपीजी गॅसची एजन्सी ( LPG Gas Agency ) देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याला मुंबईत १५ लाखांचा गंडा घातला होता. बेपत्ता झालेल्या समता नगरच्या हद्दीत उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी औरंगाबादेतील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. बँक खाते तयार करून तो लोकांना भारत गॅस एजन्सी ( Bharat Gas Agency ) देण्याचा दावा करायचा.

गॅस एजन्सीच्या नावाखाली 15 लाखांना गंडा - गॅस एजन्सी मिळवण्यासाठी एका शिक्षकाने आरोपींशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या नोंदणीच्या नावाखाली १५ लाख रुपये घेतले आणि नंतर फोन बंद केला. फसवणूक झाल्याचे वाटून तक्रारदाराने १५ एप्रिल रोजी समता नगर सायबर विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

शिक्षकाला आपली फसवणूक झाल्याचे आले लक्षात - मुंबई दिंडोशीच्या हद्दीत राहणाऱ्या एका शिक्षकाने सायबर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना प्रतापगडमध्ये भारत गॅस एजन्सी लावायची होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माहिती मिळाली आणि LPG distributorchance.org.in नावाच्या वेबसाइटवर गॅस एजन्सी संदर्भात चौकशी केली. त्याच्यासोबत चौकशी केल्यानंतर माहितीभरून घेतली. शिक्षकाला आरोपी नितीशकुमार सिंग (२६) याने भारत गॅसची एजन्सी देण्याचे वचन दिले. दरम्यान, गॅस एजन्सीच्या नोंदणीच्या बहाण्याने त्यांनी १० जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये सुमारे १५ लाख ४४ हजार रुपये ट्रान्सफर केले. सुमारे २० दिवसांनंतर शिक्षकाने आरोपी नितीश सिंह याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने सर्व फोन नंबर बंद आले. यावेळी शिक्षकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आणि त्यांनी याबाबत सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.

बिहारमधील आरोपीला औरंगाबादेतून घेतले ताब्यात - तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार नितीश सिंग याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ वेगवेगळ्या बँक खात्यांचे तपशील आणि १५ हून अधिक मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. सायबर पोलिसांनी आरोपीच्या खात्यातून १५ हजार रुपये गोठवले आहेत. तपासात आरोपी बिहारमधील नेवाडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने बी.कॉम.चे शिक्षण घेतले आहे. नितीशवर दिल्ली, मुंबई आणि औरंगाबादमध्ये सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा -Mumbai : बंटी बबली जेरबंद, 200 महिलांची पोस्टातील ठेवीच्या नावाने 5 कोटींची केली फसवणूक

ABOUT THE AUTHOR

...view details