मुंबई : दक्षिण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर भरधाव गाडी फुटपाथवर चढल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, चार जखमी आहेत. जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेले लोक फुटपाथवरील होते, की गाडीमधील होते याबाबत साशंकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सर्व जखमींना जेजे रुग्णालयात नेले. त्याठिकाणी चौघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अन्य चार जणांवर उपचार सुरू आहेत.