मुबंई - मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी प्रवक्ते सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. सुभाष तळेकर यांच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बेवाल्यांना मोटरसायकल देण्याच्या नावाखाली कागदपत्रे जमा करुन त्यावर सह्या घेतल्या. पतपेढीतून कर्ज काढून मोटस सायकल न देता कर्जाची रक्कम परस्पर लाटली असा त्यांच्यावर आरोप आहे.
नवी मुंबईतील एका पतपेढी संस्थेच्या मदतीने मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ही दुचाकी देणार असल्याचं सांगून सुभाष तळेकर याने साठ डबेवाल्यांकडून त्यांची कागदपत्रे गोळा केली होती. त्यानुसार काही डबेवाल्यांना दुचाकी मिळाल्या खऱ्या परंतु त्यांना आरटीओचा परवाना नव्हता सोबतच अनेक डबेवाल्यांना दुचाकी तर मिळाली नाहीच. परंतु त्यांच्या खात्यातून पैसे वजा व्हायला सुरुवात झाली. तसेच काही डबेवाल्यांना कर्ज फेडण्यासाठी पतपेढी कडून फोन देखील येऊ लागले.