मुंबई- कथित 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Minister Anil Deshmukh ) यांना ईडीने अटक केली होती. अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी आज (दि. २७ जानेवारी) मुंबई सत्र न्यायालयातील PMLA न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला ( Bail Application ) आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. आता या अर्जावर 3 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांना दिलासा मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण, देशमुखांना जामीन मिळणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात आज अर्ज करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती.