महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hijabwali Gym Mumbai : कम्फर्ट झोनसाठी खास महिलांसाठी सुरु झाली 'हिजाबवाली जीम'

मुंबईत हिजाब घालण्यास नकार दिल्याने ( Muslim Women Started a Hijabwali Gym in Mumbai ) पतीने महिलेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना मुंबईत काही मुस्लिम महिलांनी आपल्या कम्फर्ट झोनसाठी फक्त महिलांसाठी हिजाबवाली जीम सुरू केली ( Hijabwali Gym For Safety Women ) आहे. कशी आहे ही जीम? फक्त महिलांसाठी जीम सुरू करण्यामागे नेमके काय कारण आहे, हे जाणून घेऊया.

Muslim Women Started a Hijabwali Gym in Mumbai
महिलांना कम्फर्ट झोनसाठी त्यांनी सुरू केली खास महिलांसाठी हिजाबवाली जीम

By

Published : Oct 3, 2022, 2:48 PM IST

मुंबई : इराणमध्ये हिजाबवरून वाद सुरू ( Controversy Over Hijab was Going on in Iran ) असतानाच काही दिवसांपूर्वी मुंबईत हिजाब घालण्यास नकार दिल्याने पतीने महिलेची हत्या ( Hijabwali Gym For Safety Women ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना मुंबईत काही मुस्लिम ( Women Comfort Zone That He Started a Hijabwali Gym ) महिलांनी आपल्या कम्फर्ट झोनसाठी फक्त महिलांसाठी हिजाबवाली ( Muslim Women Started a Hijabwali Gym in Mumbai ) जीम सुरू केली आहे. कशी आहे ही जीम? फक्त महिलांसाठी जीम सुरू करण्यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया यासंबंधीचा खास रिपोर्ट.

महिलांना कम्फर्ट झोनसाठी त्यांनी सुरू केली खास महिलांसाठी हिजाबवाली जीम


म्हणून सुरू केली जीम :यासंदर्भात ईटीव्हीशी बोलताना इथल्या जीम ओनर समिरा सांगतात की, "आजच्या घडीला प्रत्येकालाच आपला फिजिकल फिटनेस महत्वाचे आहे. तुमचे शरीर तंदुरुस्त असेल, तर सर्व काही चांगले होते. अशात महिलादेखील मागे नाहीत. निरोगी स्वास्थ्यासाठी महिलादेखील जीममध्ये जात असतात. मात्र, अनेकदा जीममध्ये व्यायाम करताना तिथे असलेल्या पुरुषांच्या नजरा या त्या महिलांना ताडत असतात. अशा वातावरणात अनेक जणी अवघडून व्यायाम करीत असतात. तर, काही महिला याच कारणामुळे जीमला जाणे टाळतात. याच कारणामुळे आम्ही ही खास महिलांसाठी जीम सुरू केली आहे. परंतु यात अनेक महिला या मुस्लिम असल्याने त्या हिजाब परिधान व्यायाम करतात."

सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी जीम खुली :तर इथल्या फिटनेस टीचर तस्नीम सांगतात की, "ही एक महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली जीम आहे. इथे प्रत्येक महिलेच्या कम्फर्ट झोनची काळजी घेतली जाते. येथे अनेक महिला हिजाब घालून व्यायाम करणे पसंत करतात. येथे कोणतीही धार्मिक बंधन नाहीत. ही जीम सर्व जातीधर्माच्या महिलांसाठी खुली आहे. ज्या महिला हिजाब घालून व्यायाम करतात त्यांना एखाद्या वेळेस हिजाब घालून व्यायाम करणे जमत नाही, त्यावेळेस त्या हिजाब काढूदेखील शकतात. एखाद्यावेळी अवघडल्यासारखे होते अशा वेळी या महिला हिजाब काढतात. येथे आम्ही त्यांच्या फिजिकल फिटनेसकडे विशेष लक्ष देतो."

योगासाठी असा काही नियम नाही :येथील योगा शिक्षक कल्याणी सांगतात की, "अनेकदा योगा शिक्षक असेच कपडे घालतात तसेच कपडे घालून योगा करण्यासाठी या असे सांगत असतात. पण, या जीममध्ये तसे काही नाही. मलादेखील इथल्या महिलांनी आम्ही कशा प्रकारचे कपडे घालून योगा ट्रेनिंगसाठी येऊ असे प्रश्न विचारले. माझे या सर्व महिलांना एकच सांगणे आहे. योगा करण्यासाठी योगा सुटच घातला पाहिजे, असा काही नियम नाही. त्यामुळे तुम्हाला जे कपडे योग्य वाटतात. ज्या पेहरावात तुम्हाला कम्फर्ट वाटतं अशा पेहरावात तुम्ही योगा करा. माझा योगामध्ये प्राणायमावर विशेष जोर असतो."

दरम्यान, ही हिजाबवाली जीम मुंबईतील खडक बांबू बाजार येथे असून, ज्या महिलांना व्यायामससाठी एक कम्फर्ट झोन हवा आहे, अशा महिलांनी येथे जरूर यावे असे आवाहन येथील जीम ओनर समिरा यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details