महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन - कोरोना

मुख्यमंत्र्यांसोबत काल बोलणं झालं आहे. जर कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांत लॉकडाऊन लावावे लागेल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल अशी माहिती टोपेंनी दिली. लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियम पाळायला हवे असे आवाहन त्यांनी केले.

लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा
लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा

By

Published : Mar 22, 2021, 7:30 PM IST

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी केले. राज्यातील परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनविषयी गांभीर्याने विचार होऊ शकतो असेही ते पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुख्यमंत्र्यांसोबत काल बोलणं झालं आहे. जर कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांत लॉकडाऊन लावावे लागेल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल अशी माहिती टोपेंनी दिली. लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियम पाळायला हवे असे आवाहन त्यांनी केले.

नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन

लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे राजेश टोपे यावेळी म्हणाले. राज्यात आजघडीला 2 लाख 10 हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी 85 टक्के रुग्ण लक्षण विरहित आहेत. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. राज्यातील परिस्थिती अशीच राहिली तर मग लॉकडाऊनबाबत गांभीर्याने विचार होऊ शकतो असे टोपे म्हणाले. राज्यात केंद्राच्या कमिटीने ठरवून दिलेल्या गाईडलाईन्सनुसारच आमचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात 75 टक्के आरटीपीसीआर तपासण्या आपण करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाचा वेग वाढविणार

राज्यात लसीकरणचा वेग वाढविणार असल्याचे सांगत रोज 3 लाखांपेक्षा जास्त लसीकरण केले जात आहे असे टोपे म्हणाले. आतापर्यंत राज्यात लसीचे 45 लाख डोस देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी असल्याचेही ते म्हणाले. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळाली पाहिजे. आम्ही तिथे 17 लाख डोस तयार करू शकतो असेही टोपे यांनी सांगितले. राज्याला दर आठवड्याला 21 लाख लसीकरण करायचे असल्याने त्या दृष्टीने लस उपलब्ध झाल्या पाहिजे असेही ते म्हणाले. सध्याची स्थिती पाहता खासगी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी 80 टक्के खाटा राखून ठेवल्या जातील. डॅशबोर्ड नियमितपणे अपडेट केला जाईल आणि रुग्णाला उपचार मिळण्यास प्राधान्य असेल असेही ते म्हणाले.

हेही वाचा -मुंबई : महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली, मुंबईतील अनेक चित्रपटगृहात अँटिजेन टेस्टच होत नाहीत

ABOUT THE AUTHOR

...view details