मुंबई - मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई मेशन ही इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे मोहम्मद आलम आणि शेख उबेद हे काका पुतणे दैव बलवत्तर म्हणून वाचले आहेत.
डोंगरी दुर्घटना : नशीब बलवत्तर म्हणून काका पुतण्यासह 5 जण वाचले - casualty
ही इमारत आज (मंगळवार) सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी कोसळण्यापूर्वी एका बाजूला कलली होती. या इमारतीत राहणारे मोहम्मद आलम यांच्या ही गोष्ट लक्षात आली. यानंतर त्यांचे कुटुंब तत्काळ या इमारतीतून बाहेर पडले.
डोंगरी दुर्घटना
ही इमारत आज (मंगळवार) सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी कोसळण्यापूर्वी एका बाजूला कलली होती. या इमारतीत राहणारे मोहम्मद आलम यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ही गोष्ट लक्षात येताच ते तत्काळ घरातील 3 जणांसह इमारतीतून बाहेर पडले. इमारत कोसळली तेव्हा त्यांचा 11 वर्षांचा पुतण्या शाळेत गेला होता. त्यामुळे तोही या दुर्घटनेत वाचला आहे.
Last Updated : Jul 16, 2019, 3:23 PM IST