महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीसाठी केवळ अर्ध्या जागांनाच प्रतिसाद; यंदाही वाणिज्य शाखेकडेच सर्वाधिक कल - Commerce branch

मुंबईत यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी वाणिज्य शाखेलाच विद्यार्थ्यांनी आपली सर्वाधिक पसंती दर्शविल्याचे समोर आले आहे. त्या खालोखाल विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई विभाग

By

Published : Jul 4, 2019, 10:15 PM IST

मुंबई - महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी जाहीर झाली. यात ऑनलाईनच्या प्रवेशासाठी असलेल्या एकूण ३ लाख १९ हजार १८६ जागांपैकी केवळ १ लाख ८५ हजार ४७७ जागांसाठीच विद्यार्थ्यांनी अर्ज केला असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईनसाठी असलेल्या उर्वरित १ लाख ३३ हजार ७०९ जागा पहिल्याच गुणवत्ता यादीत रिकाम्या राहिल्याने इतर प्रवेश फेऱ्यांमध्ये यात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई विभाग

महानगर क्षेत्रात मागील वर्षी ७८६ कनिष्ठ महाविद्यालये होती, यंदाच्या शैक्षणिक वर्षात तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री यांच्या धोरणामुळे आणखी १७ महाविद्यालयांची भर पडली. यामुळे यंदाच्या प्रवेशासाठी मुंबईत २ हजार ७०० च्या आसपास जागा वाढल्या असल्याने मागील वर्षांच्या तुलनेत मुंबई महानगरक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अकरावीच्या जागा रिकाम्या राहणार आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठीची पहिल्या गुणवत्ता यादीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आज सायंकाळी संपली. या यादीसाठी एकूण १ लाख ८५ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. यात विद्यार्थीनी ९२ हजार २२० तर ९३ हजार २५७ इतक्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे मुंबईत यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी वाणिज्य शाखेलाच विद्यार्थ्यांनी आपली सर्वाधिक पसंती दर्शविल्याचे समोर आले आहे. त्या खालोखाल विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेसाठी ३७ हजार ७१, वाणिज्य शाखेसाठी १ लाख ७४ हजार ४६ तसेच विज्ञान शाखेसाठी १ लाख २ हजार ४०९ आणि एच.एस.व्ही.सी.या अभ्यासक्रमासाठी ५ हजार ६६० अशा एकूण ३ लाख १९ हजार १८६ जागा उपलब्ध आहेत. यात राज्य शिक्षण मंडळाचा अपवाद वगळता केंद्रीय आणि इतर मंडळातील १६ हजार ४८२ विद्यार्थ्यांनीही अकरावीसाठी अर्ज केला आहे.

मंडळनिहाय ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेले विद्यार्थी

एस.एस.सी-१ लाख ६८ हजार ९९५

सी.बी.एस.ई- ५ हजार ९६९
आय.सी.एस.ई-७ हजार ८८१
आय.बी- ०७
आय.जी.सी.एस.ई- ९०८
इन.आय.ओ.एस- ५९८
इतर-१ हजार ११९

एकूण - १ लाख ८५ हजार ४७७

ABOUT THE AUTHOR

...view details