मुंबई अवघ्या मुंबईसह देशभरातील प्रसिद्ध लालबागचा राजाचे Lalbagh Raja 2022प्रथम दर्शन आज सांयकाळी ७ वाजता होणार आहे. तसेच घरबसल्याही लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वरून ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.
उत्सवाचे हे 89 वे वर्षे लालबागचा राजा हे केवळ मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात सुप्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळांपैकी एक आहे. लालबागचा राजा गणपती उत्सवाचे हे 89 वे वर्षे आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे 2 वर्षांपासून भाविकांना लालबागच्या राजाचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही. भाविकांना फक्त ऑनलाइन दर्शनाची परवानगी होती. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. अशातच लालबागच्या राजाचे आज सांयकाळी पहिले दर्शन होणार आहे. आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे घरबसल्या बापाचे दर्शन घेता यावे, यासाठी मंडळाने अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वरून लालबागच्या राजाचे ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. आज सायंकाळी ७ पासून दर्शनाला सुरुवात होईल. यंदा ३१ ऑगस्टपासून ९ सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.lalbaugcharaja.com
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:https://youtu.be/Yrfsd3NsGdQ