महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील दुकानाला आग...2 तासानंतर आगीवर नियंत्रण

हार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकाजवळ असलेल्या मार्केटमधील एका दुकानाला पहाटे आग लागली. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून या घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

By

Published : Oct 1, 2020, 9:33 AM IST

मुंबई आपत्कालीन विभाग
चेंबूरमधील दुकानाला आग...जीवितहानी नाही

मुंबई - हार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकाजवळ असलेल्या मार्केटमधील एका दुकानाला पहाटे आग लागली. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून या घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून या घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ जनता मार्केट आहे. या मार्केटमधील दुकानाला पहाटे 5.21 वाजता आग लागली. आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच रेल्वे स्थानक व इतर दुकाने असल्याने अग्निशमन दलाने लेव्हल-2 च्या आगीची घोषणा करत 10 अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पाठवली.

तब्बल 2 तास 20 मिनिटानंतर या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. पहाटेची वेळ असल्याने दुकानात कोणी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. याबाबत अधिक माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details