Mumbai Fire News : रेती बंदर येथील झोपड्या, गोडाऊनला आग - रेतीबंदर आग
रेती बंदर येथील झोपड्या आणि गोडाऊनला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनी शेजारी असलेल्या लक्ष्मी पेट्रोल पंप जवळच ही झोपडपट्टी आहे.
फाईल फोटो
मुंबई -रेती बंदर येथील झोपड्या आणि गोडाऊनला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनी शेजारी असलेल्या लक्ष्मी पेट्रोल पंप जवळच ही झोपडपट्टी आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगविझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेले नाहीअसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.