मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या एका वृत्त वाहिनीच्या चार पत्रकारांवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना संबंधित वृत्तवाहिनीने हा 'प्रसारमाध्यमांच्या हक्कांवर हल्ला' आहे आणि आम्ही या विरोधात 'भक्कम रणनीती' घेऊन लढा देऊ, असे म्हटले आहे. यापूर्वी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) सह छेडछाडीच्या प्रकरणात संबंधित टीव्हीचे नावही समोर आले होते.
पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या पत्रकारांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सातत्याने मुंबई पोलिसांची बदनामी केली जात होती. तसेच टीआरपी घोट्याळ्यातही या वाहिनीचे नाव आले होते. या प्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता, की मुंबईतील काही वृत्तवाहिन्या लोकांना पैसे देऊन त्यांच्या चॅनेलची टीआरपी वाढवत आहेत. त्यानंतर या प्रकरणी मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीतील आरोपी-
'पुछता है भारत' कार्यक्रम चालवणाऱ्या वृत्त वाहिनीच्या अडचणीत वाढ, गुन्हे दाखल - puchhcta hai bharat
मुंबई पोलिसांची बदनामी करण्याच्या आरोपाखाली मुंबईतील एका वृत्त वाहिनीच्या चार पत्रकारांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चार पत्रकारांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल
1 सागरिका मित्र डेप्युटी न्यूज एडिटर,
2 शिवानी गुप्ता अँकर / वरिष्ठ सहकारी संपादक,
3 श्रवन सेन उपसंपादक,
4 निरंजन नारायणस्वामी कार्यकारी संपादक
यांच्याविरोधात संबंधित अहवाल प्रसारित होण्यासाठी संपादकीय कर्मचारी व न्यूजरूम प्रभारी व इतर संबंधित आरोपींवर पोलीस दलातील सदस्याबद्दल असंतोष निर्माण करणे आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे गुन्हे केले आहेत.