महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा भाजप कार्यालयासमोरच गोंधळ - BJP mumbai head office

पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या ग्राहकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे.

पीएमसी बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यासाठी भाजप कार्यालयासमोरच ग्राहकांचा गोंधळ

By

Published : Oct 10, 2019, 1:14 PM IST

Updated : Oct 10, 2019, 2:41 PM IST

मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या ग्राहकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेला वाचवण्यासाठी या बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्राहक करत आहेत.

पीएमसी बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यासाठी भाजप कार्यालयासमोरच ग्राहकांचा गोंधळ

यावेळी काही ग्राहकांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांनी आवरण्याचा प्रयत्न केला. प्रदेश कार्यालयामध्ये पीएमसी बँक ग्राहकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटण्याचाही प्रयत्न केला. यासंदर्भात सरकारने पीएमसी बँकेला वाचवण्यासाठी तसेच ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी बँकेचे विलीनीकरण करावे, अशी मागणी केली.

Last Updated : Oct 10, 2019, 2:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details