महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya attacked again : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा : किरीट सोमय्या यांची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे सादर (The Director General of Police) करून त्यांच्या अटकेची मागणी (Demand of Arrest) केली आहे. सदानंद कदम यांच्या पत्रानुसार दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा दावा पुन्‍हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. याप्रकरणी त्‍यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajneesh Sheth) यांची भेट घेतली आहे तसेच अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीदेखील आज करण्यात आली आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमय्या

By

Published : Jun 6, 2022, 8:09 PM IST

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा अनिल परबांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच रामदास कदम यांचे लहान बंधूसदानंद कदम (Sadananda Kadam) यांच्या पत्रानुसार दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा दावा पुन्‍हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. याप्रकरणी त्‍यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली आहे तसेच अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीदेखील आज करण्यात आली आहे.


सोमय्यांनी पोलीस महासंचालकांना अनिल परबांच्या अटकेची मागणी : साेमय्‍या म्‍हणाले की राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीने छापा मारला होता. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रिसॉर्टच्या खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली होती. ईडीच्या कारवाईनंतर या रिसॉर्टशी माझा संबंध नसून रिसॉर्टचे मालक मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम आहेत. ते रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही, असा दावा अनिल परब यांनी केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी आज पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर सोमय्या यांनी सदानंद कदम यांच्या पत्राचे वाचन प्रसारमाध्यमांसमोर केले. दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्याच मालकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.



पोलिसांकडे सादर केली महत्त्वाची कागदपत्रे : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आम्ही कागपत्रे दिली आहेत. अनिल परब म्हणत आहेत की, रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या भागीदाराचा आहे. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान भाऊ आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, मी अर्जदार सदानंद कदम, रत्नागिरी, ग्रामपंचायत नमुना 8 या अभिलेखात नोंद होणेबाबत. वरील विषयाने आपणास कळवू इच्छितो की मी सदानंद कदम मौजे मुरुड येथील गट क्रमांक 446 व येथील मालमत्ता क्रमांक 1074 ही अनिल परब यांच्या नावे दाखल असून मी खरेदी केली आहे. ती माझ्या नावाने करावी ही विनंती.

सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका : सोबत खरेदी पत्र आणि बाकी कागदपत्रे देत आहेत, असे म्हटले आहे. या पत्राची तारीख 27 जानेवारी 2021 आहे ज्यावेळी अनिल परब हे मंत्री तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असे किरीट सोमय्या म्हणाले. अनिल परब तुम्हीच वर्षभर खोटे बोलत आहात की तुम्हाला उद्धव ठाकरे बोलायला लावत आहेत? तुम्ही ज्याची साक्ष देत आहात त्या सदानंद कदम यांनी हे लिहून दिले आहे. सदानंद कदम यांनी 2021-22 यांनी मालमत्ता कर भरला. त्यानंतर ही मालमत्ता कदम यांच्या नावाने हस्तांतरित झाली असेही किरीट सोमय्या म्हणाले.











Conclusion : Kirit Somaiya in Dapoli : अनिल परब यांचे रिसोर्ट तोडण्यावरून सोमय्या आक्रमक; भाजपा कार्यकर्ते दापोलीकडे रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details