मुंबई - शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता रुग्ण वाढत असलेल्या विभागात 'फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. या फिव्हर क्लिनिकमधून तपासण्यात आलेल्या ९१२ नमुन्यांपैकी ५ व्यक्तींनाच कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच ०.५४ टक्के लोक बाधित आढळून आले. पॉझिटिव्ह असलेल्या पाच व्यक्तींनी परदेशात प्रवास केला होता. तसेच अन्य काही प्रवास करणाऱ्यांच्या निकट संपर्कातील आहेत. बाधित व्यक्तींच्या या आकडेवारीवरून अजूनही 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केलाय.
आता 'फिव्हर क्लिनिक' मार्फत चाचण्या; ९१२ पैकी ५ रुग्ण 'पॉझिटिव्ह'
शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता रुग्ण वाढत असलेल्या विभागात 'फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. या फिव्हर क्लिनिकमधून तपासण्यात आलेल्या ९१२ नमुन्यांपैकी ५ व्यक्तींनाच कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेची यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. कोरोनाचा संसर्ग गावठाणे, चाळी, झोपडपट्ट्यांत पोहचला आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागापुढे मोठे आव्बान आहे. हा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये, यासाठी पालिकेने यंत्रणा सज्ज केलीय. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या अधिक असलेल्या परिसरात महापालिकेद्वारे 'फिव्हर क्लिनीक'चे आयोजन करण्यात येत आहे. या क्लिनिकमध्ये बाधित रुग्णांच्या इमारतीत किंवा लगतच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी सुरू आहे. यानुसार महापालिकेने आजवर ९७ फिव्हर क्लिनीक्सची स्थापना केली आहे. या 'क्लिनिक'मध्ये आतापर्यंत ३ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना विषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यापैकी निर्धारित निकषांनुसार ९१२ व्यक्तींचे नमुने आवश्यक तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यानंतर पाच व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे. हे पाच व्यक्तीदेखील 'ट्रॅव्हल हिस्टरी' असणारे किंवा ट्रॅव्हल हिस्टरी असणाऱ्यांच्या निकटच्या संपर्कात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
'फिव्हर क्लिनिक' मध्ये अर्धा टक्के लोक बाधित
फिव्हर क्लिनिक' हे अधिक तीव्रता असलेल्या दाटीवाटीच्या किंवा झोपडपट्टीच्या भागांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. यात तपासणी करण्यात आलेल्या ९१२ नमुन्यांपैकी ५ व्यक्तींचे नमुने बाधित आढळून आले. म्हणजे ०.५४ टक्के अर्थात सुमारे अर्धा टक्के लोक बाधित आढळून आले. बाधित व्यक्तींच्या या आकडेवारीवरून अजूनही 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.