महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किळसवाणे! पवईत 9 वर्षाच्या भटक्या कुत्रीवर सामूहिक बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल - female stray dog rape

डॉक्टरांनी तपासल्यानंतर कुत्रीच्या लघवीच्या जागेत एक लाकडी पट्टी आढळली. उपचारानंतर धक्कादायक खुलासा झाला. या कुत्रीवर काही जणांनी लाकडी पट्टी घुसवून जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केल्याची माहिती समोर आली.

stray dog rape
किळसवाणे...पवईत 9 वर्षाच्या भटक्या कुत्रीवर सामूहिक बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

By

Published : Oct 24, 2020, 11:44 AM IST

Updated : Oct 24, 2020, 3:42 PM IST

मुंबई - पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक किळस आणणारी घटना घडली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात भटक्या कुत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर कुत्रीच्या लघवीच्या जागेत एक लाकडी पट्टी आढळली.
'बॉम्बे अ‌ॅनिमल राईट्स' संस्थेकडून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवई परिसरात एका 9 वर्षाच्या कुत्रीवर काही अज्ञात आरोपींनी बलात्कार केला. 22 ऑक्टोबर रोजी पवई हिरानंदानी येथील गॅलेरिया मॉलजवळ या कुत्रीच्या लघवीच्या जागेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचं तेथील दोन महिलांच्या निदर्शनास आलं.
किळसवाणे...पवईत 9 वर्षाच्या भटक्या कुत्रीवर सामूहिक बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

या दोन महिला गेल्या काही दिवसांपासून संबंधित कुत्रीचा सांभाळ करत होत्या. मात्र या श्वानाच्या लघवीच्या जागेतून रक्त वाहत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित तिला जोगेश्वरी येथील प्राण्यांच्या रुग्णालयात नेले होते.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिच्या लघवीच्या जागेत एक लाकडी पट्टी आढळली. उपचारानंतर धक्कादायक खुलासा झाला. या कुत्रीवर काही जणांनी लाकडी पट्टी घुसवून जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केल्याची माहिती समोर आली.

यासंदर्भात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम 429, 377 व प्राणी संरक्षण अधिनियमच्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Last Updated : Oct 24, 2020, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details