महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

व्हिडिओ : ...अन् 'तिने' प्रवाशाला वाचविले - मुंबई लोकल ट्रेन अपघात

एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये बसत असताना त्या प्रवाशाचा तोल गेला आणि त्याचे संतुलन बिघडले. परिणामी ट्रेनच्या दरवाजाला अडकून फरफटत जात होता. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ महिला कॉन्स्टेबल दीपा राणीने प्रसंगावधान दाखवून तातडीने त्या प्रवाशाकडे धाव घेतली आणि त्याला सुरक्षितपणे बाजूला खेचले.

रेल्वे अपघात
रेल्वे अपघात

By

Published : Jun 28, 2021, 8:32 PM IST

Updated : Jun 28, 2021, 9:40 PM IST

मुंबई -हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढताना एक प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडत होता. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ महिला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशाचा जीव वाचविला. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपली गेली आहे.

मुंबई लोकल ट्रेन अपघात

अशी घडली घटना-

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पनवेलला जाणारी लोकल आली होती. त्यानंतर आपल्या ठरलेल्या वेळेनंतर लोकल पुढे रवाना होत होती. यादरम्यान एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये बसत असताना त्या प्रवाशाचा तोल गेला आणि त्याचे संतुलन बिघडले. परिणामी ट्रेनचा दरवाजाला अडकून फरफटत जात होता. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ महिला कॉन्स्टेबल दीपा राणीने प्रसंगावधान दाखवून तातडीने त्या प्रवाशाकडे धाव घेतली आणि त्याला सुरक्षितपणे बाजूला खेचले. त्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचलेला आहे. ही घटना रविवारी (दि. २७ जून) सकाळी ९ वाजून ४९ मिनिटाच्या दरम्यान घडली आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल -

ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये टिपली गेली आहे. शिवाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. रेल्वे गार्ड जितेंद्र पाल आणि आरपीएफ महिला पोलीस दीपा राणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दीपा राणीने सांगितले की, प्रवाशांना सुरक्षित ठेवणे हे आमचे काम आहे. मला हे काम करत असताना समाधान वाटते. प्रवाशांना आवाहन आहे की, धावती लोकल पकडू नये.

हेही वाचा -Erode 'Corona pill' : कोरोनाच्या गोळ्या सांगून दिले कीटकनाशक; ३ जणांचा मृत्यू, 2 आरोपींना अटक

Last Updated : Jun 28, 2021, 9:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details