मुंबई - विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आज (मंगळवार) निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून माजी उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर विरोधीपक्षाकडून भाजप नेते व विधान परिषद सदस्य भाई गिरकर यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक, आघाडीकडून डॉ. निलम गोऱ्हे तर भाजपकडून भाई गिरकर मैदानात - mumbai assembly news
सभागृहात ऐनवेळी भाजपकडून मतदान घेण्याचा विषय आला आणि त्याच वेळात जर सत्ताधारी पक्षाचे सदस्य कमी पडले अथवा ऐनवेळी मतविभाजन झाले तर गोऱ्हे यांची अडचण होऊ शकते. त्यातच हे मतदान सरकारकडून कोरोनाच्या कारणासाठी रेटून नेत गोऱ्हे यांची निवड जाहीरही केली जाऊ शकेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे भाजपकडून सभागृहातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊनच भाई गिरकर यांचा अर्ज मागेही घेतला जाऊ शकतो.
डॉ. गोऱ्हे या २९ जून २०१९ ला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, मध्येच त्यांचा विधानपरिषदेचा कालावधी हा संपल्यामुळे त्यांचे हे पद आपोआपच संपले होते. त्यांना केवळ दहा महिन्यांचाच कालावधी मिळाला होता. आता पुन्हा त्या मैदानात उभ्या असून महाविकास आघाडीचे बहुमतही त्यांच्या मागे असल्याने त्याचीच पुन्हा एकदा निवड होईल असे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत अनेक ज्येष्ठ सदस्य या अधिवेशनात गैरहजर राहिले आहेत. तर अनेकांनी सभापतींकडे विविध कारणांसाठी या अधिवेशनाला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे सभागृहात ऐनवेळी भाजपकडून मतदान घेण्याचा विषय आला आणि त्याच वेळात जर सत्ताधारी पक्षाचे सदस्य कमी पडले अथवा ऐनवेळी मतविभाजन झाले तर गोऱ्हे यांची अडचण होऊ शकते. त्यातच हे मतदान सरकारकडून कोरोनाच्या कारणासाठी रेटून नेत गोऱ्हे यांची निवड जाहीरही केली जाऊ शकेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे भाजपकडून सभागृहातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊनच भाई गिरकर यांचा अर्ज मागेही घेतला जाऊ शकतो अथवा मतदानाचा विषय आल्यास ते मैदानात राहू शकतील, असेही राजकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
राज्य विधानपरिषदेत २३ जुलै १९३७ पासून ते आत्तापर्यंत १३ उपसभापती आले आहेत. यात पहिले उपसभापती म्हणून रामचंद्र सोमण यांची निवड झाली होती. त्यानंतर शांतीलाल शहा, व्ही.जी. लिमये, जे.टी. सिपाहीमलानी, व्ही. एन. देसाई, रामकृष्ण गवई, अर्जून पवार, दाजीबा पाटील, सूर्यभान वहाडणे, प्रा. नारायण फरांदे, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. यात सर्वात जास्त या पदावर वसंत डावखरे हे राहिले आहेत. तर सर्वात कमी कालावधी हा गोऱ्हे यांचाच ठरला होता. मात्र त्या पुन्हा या पदावर येण्याची शक्यता असल्याने त्या राज्य विधानपरिषदेच्या १४ व्या उपसभापती होण्याची शक्यता आहे.