महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बिघडलेल्या अर्थव्यवस्थेसह रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची अपेक्षा

वाढती महागाई आटोक्यात यावी, सरकारी कंपन्याचे होणारे खासगीकरण थांबावे, लोकांचा गेलेला रोजगार परत मिळण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर व्हावे, अशा काही मागण्या सर्वसामान्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केल्या.

economy
economy

By

Published : Jan 29, 2021, 7:50 PM IST

Updated : Jan 29, 2021, 8:01 PM IST

मुंबई - यंदाचा अर्थसंकल्प (बजेट) येत्या सोमवारी (१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांना कसा अर्थसंकल्प अपेक्षित आहे जाणून घेण्यासाठी इटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट...

'आर्थिक पॅकेज मिळावे'

गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे अनेक बदल झाले. या कोरोनाच्या प्रादुर्भावाला थांबवण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या संकटापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था बिघडली. या लॉकडाऊनकाळात देशातील अनेक क्षेत्रांना मोठा दणका बसला आहे. अनेकांचा रोजगार गेला. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार कशाप्रकारे या परिस्थितीला सावरण्यासाठी अर्थनियोजन कशाप्रकारे आखते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच त्यात कोणत्या क्षेत्राला कसा आणि किती दिलासा सरकार देणार आहे, हे पाहणेदेखील निर्णायक ठरणार आहे. वाढती महागाई आटोक्यात यावी, सरकारी कंपन्याचे होणारे खासगीकरण थांबावे, लोकांचा गेलेला रोजगार परत मिळण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर व्हावे, अशा काही मागण्या सर्वसामान्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केल्या.

'जनजीवन सुधारण्यासंदर्भात तरतूद हवी'

आरोग्य व्यवस्थेचे राष्ट्रीयकरण, जीएसटीमध्ये सवलत, लोकांचे जनजीवन सुधारेल अशा तरतुदी अशाप्रकारच्या अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Last Updated : Jan 29, 2021, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details