मुंबई - १६ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर सुनावणी (Supreme Court Decision) करताना सर्वोच्च न्यायालयाने या १६ आमदारांना मोठा दिलासा दिला आहे. जोपर्यंत नवीन घटनापीठ स्थापन होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याविषयी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया (Balasaheb Thorat reaction) दिली आहे. याविषयी बोलताना थोरात म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे तो बघावा लागेल. तो दिलासा कोणाला आहे, हे देखील तपासावे लागेल. आम्हाला अपेक्षित होते निर्णय लवकर दिला पाहिजे. पक्षांतर बंदी यावर अपेक्षित निर्णय घेतला जाईल अशीही अपेक्षा आम्हाला असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात? राष्ट्रपती निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी कडून उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना शिवसेनेकडून पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या विषयावर बोलताना थोरात म्हणाले की, हा त्यांचा शिवसेनेचा अंतर्गत निर्णय आहे. यासंदर्भात यूपीएची १७ तारखेला मुंबई बैठक होत आहे. शिवसेना नेमका वेगळा निर्णय घेते का? ते बघावा लागेल. सेनेकडून अद्यापही अंतिम निर्णय सांगितला गेला नाही आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असं पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे त्याचबरोबर खासदार राजेंद्र गावित यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Letter ) यांना लिहिलं होतं.