मुंबई: मुंबई विद्यापीठाने कला शाखेतील द्वितीय सत्र 2022 हिवाळी यासाठी प्रथम वर्षातील द्वितीय वर्षाच्या महाविद्यालयीन परीक्षांची मुदत वाढवली होती. ती आता निश्चित करण्यात आली असून 22 ऑक्टोंबरपर्यंत परीक्षा घेतली जाणार आहेत.
Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या प्रथम, द्वितीय वर्ष परीक्षेच्या तारखा जाहीर..
Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाने कला शाखेतील द्वितीय सत्र 2022 हिवाळी यासाठी प्रथम वर्षातील द्वितीय वर्षाच्या महाविद्यालयीन परीक्षांची मुदत वाढवली होती. ती आता निश्चित करण्यात आली असून 22 ऑक्टोंबरपर्यंत परीक्षा घेतली जाणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालकांची माहिती मुंबई विद्यापीठाशी संलग्न 600 पेक्षा अधिक महाविद्यालय आहेत. लाखो विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची Mumbai University निगडित आहेत. मुंबई विद्यापीठाने प्रशासकीय कारणास्तव एफवाय आणि एसवायच्या कला, वाणिज्य, आणि विज्ञान शाखेच्या परीक्षांची तारीख पुढे ढकलली होती. मात्र आता मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ) डॉक्टर प्रसाद कारंडे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला असता त्यांनी नमूद केले आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न मान्यताकला वाणिज्य विज्ञान शाखेच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत घेण्यात याव्यात, अशी सूचना सर्व संलग्न महाविद्यालयाला करण्यात आल्याचे सांगितले आहे. हा आदेश मुंबई विद्यापीठाशी संलग्न मान्यता प्राप्त महाविद्यालय मुक्त अध्ययन संस्था माहिती व तंत्रज्ञान संस्था तसेच रत्नागिरी, ठाणे, कल्याण या परिसरातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय मुंबई विद्यापीठ परिसर या सर्वांना लागू असणार आहे.