मुंबई - मुंबई विद्यापीठाने 2022 च्या प्रथम सत्राच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या ( Mumbai University Summer Session Exam ) आहेत. 19 एप्रिल 2022 पासून परीक्षेला सुरूवात होणार ( Exam Fever 2022 ) सुरूवात होणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन तर पारंपारिक कला, वाणिज्य विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस) नियमित व बँकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने ( practical examinations of Vocational Course ) घेतलेल्या आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन - सत्र 6 च्या परीक्षा ( Session 6 exams ) ह्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असतात. त्यानुसार या परीक्षेचा निकालही वेळेवर जाहीर ( result of this examination ) करणे आवश्यक असते.
सत्र 6 च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन -विद्यार्थ्यांचे पुढील उच्च शिक्षण तसेच नोकरी अवलंबून असते. या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या एकूण लसीकरण याची संख्या तसेच कोकणातील एसटी महामंडळाच्या संपाची परिस्थिती, कोविडची परिस्थिती, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती तसेच मुंबई विद्यापीठाच्या भौगोलिक विस्तार, महाविद्यालयांची संख्या व विद्यार्थी संख्या तसेच पदवी परीक्षेचे अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी बाहेर जात असतात. त्यासाठी पदवीचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी पारंपारिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत पदवी अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस) नियमित व बँकलॉगच्या परीक्षा या ऑनलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतलेल्या आहेत. मात्र, सत्र 6 च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.
2022 च्या हिवाळी परीक्षा ऑफलाईन - 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बँकलॉगच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णयही गेल्या महिन्यात परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
पदवीच्या परीक्षा काही ऑनलाईन ऑफलाईन - पदवीच्या कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र 2 नियमित व बॅकलॉग परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येतील. तर सत्र 1, 3 व 5 बँकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. सत्र 4 ची नियमित व बँकलॉग परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येईल.कला वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर परीक्षा ऑफलाईन - सत्र 2 व 4 नियमित बॅकलॉग ह्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येतील. तसेच, सत्र 1 व 3 बॅकलॉगच्या परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्युत्तर परीक्षा ह्या 50 टक्के बहुपर्यायी प्रश्न व 50 टक्के वर्णनात्मक प्रश्न या पद्धतीने घेण्यात येतील.