मुंबई - काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जेईई आणि नीट परीक्षांमुळे राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोधळ उडाला होता. मात्र, आता राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षेचे ( CET and MHT Exam times Table ) वेळापत्र जाहीर झाले असून ११ सप्टेंबर २०२२ पासून परीक्षा सुरु ( Exam Fever 2022 ) होणार आहे. याबाबदची माहिती स्वतः उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत( Higher and Technical Education Minister Uday Samant ) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
सीईटी-एमएचटी परीक्षा पुढे का ढकली होती ? : जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेचा एकाच कालावधीत येणार असल्यान सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत आज ( सोमवारी ) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. याशिवाय लवकरच सीईटी आणि एमएचटी परीक्षा नवीन वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार, आज राज्यातील सीईटी आणि एमएचटी परीक्षेचे वेळापत्र जाहीर झाले आहे.