मुंबई उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते टाटा ग्रुपचे माजी चेअरमन Tata Group Cyrus Mistry death होते. त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मृतात जहांगीर दिनशा पंडोल आणि सायरस मिस्त्री यांचा समावेश आहे. जखमीमध्ये अनायता पंडोले (महिला), दरीयस पांडोले यांचा समावेश आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार मुंबईच्या Cyrus Mistry death in accident शेजारील महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला आहे. रविवारी झालेल्या अपघातात मिस्त्री ठार झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते, असे त्यांनी सांगितले. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. हा अपघात वाटतो, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सुर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. सायरस मिस्त्री यांच्यासह दोन लोक दगावल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजलीटाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला.सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.