मुंबई -ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी 'भारत छोडो'चा नारा दिला होता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून ब्रिटिशांना परतवून लावले होते. आजही देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पेगासससारख्या गोष्टी आणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे देश एकवटला होता. त्याचप्रमाणे, आजही देश लोकशाही वाचवण्यासाठी, भारतीय संविधानाचा मान राखण्यासाठी एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केले अभिवादन -
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (सोमवार) अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.
लोकल प्रवासासंदर्भात राज्य सरकारचा टप्प्याटप्याने निर्णय -