महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष: लॉकडाऊनचा गणेशमूर्ती व्यवसायिकांना मोठा फटका; गणेशमूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता - Lockdown Impact on Ganapati Business

'मिशन बिगीन' अंतर्गत काही व्यवसायिकांना सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाबाबत अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही. मात्र, घरगुती गणेश मूर्तीकारांनी अनलॉक 1.0 नंतर गणेशमूर्ती घडवण्यास सुरुवात केली आहे.

Ganesh idol factory
गणेश मूर्ती कारखाना

By

Published : Jun 10, 2020, 6:08 PM IST

मुंबई - 'मिशन बिगीन' अंतर्गत काही व्यवसायिकांना सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाबाबत अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही. मात्र, घरगुती गणेश मूर्तीकारांनी अनलॉक 1.0 नंतर गणेशमूर्ती घडवण्यास सुरुवात केली आहे. परंतु, लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात निघून गेले असल्याने गणेशमूर्ती कारखानदारांनाही याचा फटका बसला आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला आहे.

गणेश मूर्ती कारखानदार रोहित वस्ते यांच्यासोबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने साधला संवाद...

हेही वाचा...#CoronaEffect: यंदा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने; मानाच्या गणपती मंडळांचा निर्णय

कोरोनाचा संकट डोक्यावर असतानाही भक्तांना आस लागली आहे, ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनाचे संकट दूर होईल, अशी आशा गणेशभक्तांना आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबाबत सरकारने अद्याप निर्णय जाहीर केला नसला. तरिही घरगुती गणेशमूर्तीच्या नोंदणीसाठी गणेशभक्त पुढे आले असल्याचे पेपर गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले गणेश मूर्तीकार रोहित वस्ते यांनी सांगितले.

मागील अडीच महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे कामकाम ठप्प झाले होते. मात्र. आता कामगारच नसल्याने कामाला गती मिळत नाही. जुने एक दोन कामगार आणि नवीन शिकाऊ मुलांना घेऊन मूर्ती घडवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्ती कमी घडवण्यात येणार असल्याचे रोहित वस्ते यांनी सांगितले.

हेही वाचा...'बाप्पा'वर कोरोनाचे सावट; यंदा मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार साधेपणाने

लॉकडाऊनमुळे कच्चा मालाचा पुरवठा कमी होत आहे. मालाचा पुरवठा करणारी साखळी या काळात विस्कटली आहे. त्यामुळे यंदा मूर्तीच्या किंमतीतही 10 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता रोहित वस्ते यांनी व्यक्त केली.

दरवर्षी कागदी गणेशमूर्ती या परदेशात निर्यात होतात. मात्र, यावर्षी आंतरराष्ट्रीय विमानसेवा केव्हा पूर्ववत होईल, याबाबत ठोस सांगता येत नाही. तसेच आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या कुरियरचे दर वाढले आहेत. त्यामुळे परदेशात मूर्ती पाठवणे खर्चिक ठरणार आहे. आगामी काळात विमानसेवा कशा पद्धतीने सुरू होतात, यावरच मूर्ती निर्यात करण्याचा निर्णय घेतला जाईल. असेही रोहित वस्ते यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details