मुंबई - सोमवारी महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर गुरूवारी 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी असेल. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून विरोधकांची धूळदाण उडवली होती. भाजपने 303 तर एनडीएने तब्बल 352 जागांवर विजय मिळवला, दुसरीकडे काँग्रेसला 52 आणि यूपीएला मिळून 87 तर इतरांना 103 जागा मिळाल्या. तेव्हापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली होती. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच अनेक ठिकाणी सभांचा धुराळा उडाला होता. त्यात सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांचाही समावेश होता.
हेही वाचा...महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट
दिग्गजांच्या सभांचा धुमाकुळ
सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची रणधुमाळी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी दिवस-रात्र मेहनत करुन प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आदींनीही आपल्या प्रचार भाषणांतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ठिकठिकाणच्या उमेदवारांसाठी सभांचा झंझावात पाहायला मिळाला आहे. यावेळी त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर, प्रबळ विरोधी पक्षनेत्यासाठी मतदान करा असा वेगळाच पॅटर्न त्यांनी अवलंबला. महिनाभर आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर डागलेल्या तोफा आणि नेत्यांची घणाघाती भाषणे, जाहिरातींचा भडिमार यामुळे या निवडणुकीत कमी वेळातच प्रचाराचा मोठा धुराळा उडालाय. या धुराळ्यात सर्वसामांन्यांचे प्रश्न मात्र बाजुला पडलेत.
हेही वाचा... प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! सभा, रॅली, पदयात्रेने होणार समारोप
युती झाली मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी
निवडणूक घोषीत झाल्यानंतर सुरूवातील सर्वात जास्त चर्चा ही युती होणार की नाही याचीच झाली. अखेरीस उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणाला युतीचं गणीत समोर आले. शिवसेना आणि भाजप यांच्यात 124 जागेवर शिवसेना आणि 164 जागेवर भाजपने आपले उमेदवार उभे केले. मात्र युतीच्या घोषणेला विरोध झाल्याने सेना भाजपला इनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ कणकवलीत भाजपमध्ये गेलेल्या नितेश राणे विरोधात शिवसेने आपला अधिकृत उमेदवार दिला आहे. असा अनेक ठिकाणी युतीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले. मात्र संपूर्ण प्रचारा दरम्याण शिवसेना आणि भाजपने युती सरकारसाठी मते मागितल्याने युतीला याचा फायदा होऊ शकतो.
आघाडीचं ठरलं मात्र अनेक ठिकाणी बिघाडी