महाराष्ट्र

maharashtra

पीक विम्याची 'ही' आहे अंतिम मुदत; योजनेत सहभागी होण्याचे कृषीमंत्र्यांचे आवाहन

By

Published : Jul 29, 2020, 7:24 PM IST

पीकविमा नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली आहे.

संग्रहित -कृषीमंत्री दादाजी भुसे
संग्रहित -कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई - कोरोनाच्या संकटातही खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी खरीप हंगामासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२० आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र सरकारच्या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही चर्चेवर विश्वास ठेवू नये. पीकविमा नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली आहे.

वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांनाही भरता येणार पीक विमा

राज्यातील वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सूचना कृषी विभागाकडून जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. हे शेतकरी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) या ठिकाणीही संपर्क साधू शकतात, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

शेवटच्या दिवशी गर्दी नको-

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्राकडून (CSC) विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. दरवर्षी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी होते. अंतिम मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही. त्यामुळे 31 जुलैपूर्वीच विमा योजनेत नोंदणी करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details